दाभोळ विठ्ठल मंदिरात १३२ वा नाम सप्ताह व जिव्हेश्वर जन्मोत्सव

पश्चिम किनारपट्टीवरील अति प्राचिन छोटेखानी शहरवजा दाभोळ गाव. पूर्वापार या गावात ७५ ते ८० घरांचा स्चकुळ साळी समाज नांदत होता. परंतु काळाच्या ओघात पारंपारिक विणकाम धंदा बंद पडल्या नंतर समाज विखुरला गेला. उदरनिर्वाहाचे या ठिकाणी काहीच साधन नसल्याने साळी समाज मुंबई ठिकाणी गिरणीत काम करू लागला.परंतु सन १८८७ च्या पूर्वी या ठिकाणी समाजाने श्री.विठ्ठल मंदिराची स्थापना करून छोटेखानी मंदिराची उभारणी केली.सन १८९७ साली या मंदिरात नाम सप्ताहाला सुरूवात केली. या वर्षी १३२ वा नाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. आज गावात जेमतेम चार ते पाचच घरे आहेत. परंतु ही सर्व मंडळी पूर्वापार चालत आलेल्या रूढी म्हणजे मंदिरातील वर्षभरातील लहान मोठे १० ते ११ उत्सव आजही साजरे करतात. नाम सप्ताह हा सात दिवसांचा मोठा उत्सव त्यावेळी मात्र गावचे़ मुंबई़ पुणे़ ठाणे या ठिकाणी असणारे सर्व गावकरी सात आठ दिवस मुलाबाळांना घेऊन या नामस्प्ताहाचा आनंद घेतात. या समाजाला संगीताची परंपरा लाभलेली असल्याने कार्यक्रमाची रेलचेल होत असते. पूर्वी घराघरांत पट्टीचे गाणारे होते.तोच वसा या पिढीने चालवला आहे. रोज काकडा असतो. पहाटे पाच वाजता काकडा आरती सुरू होण्यापूर्वीच मंदिरात भाविकांची आरतीला गर्दी होत असते. असा हा सप्ताह आजतागायत पूर्वी इतकाच जोशात चालू आहे.

मंदिर देवस्थान १९५३ साली रजिस्टर करून त्याचा नंबर अ८९ असा आहे. आजपर्यंत चॅरीटी कमीशनरकडे ऑडीट रीपोर्ट पाठविला जातो. सन २०१८-१९ चा जमाखर्च तयार असून ऑडीटही करून झाले. देवस्थान कमिटीने २०० वर्षांची परंपरा लाभलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरविले असून गेल्या २८ ऑक्टोबरला भूमीपूजन सोहळा पार पाडून कामाला सुरूवातही झाली आहे. अंदाजे ८० लाखाचे बजेट असून ते १ कोटीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाचा कारभार चोख असून पारदर्शक आहे. इथल्या समाजबांधवांनी अर्धा अधिक निधी म्हणजे जवळ जवळ ४० लाख रूपये स्वतः उभे केले आहेत. २०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या कोकणात तरी दुसरी संस्था नसावी. आजतागायत या मंदिरात पूर्वापार सर्व कार्यक्रम होत असतात. चारपांच घरे असूनही देवस्थानचा कारभार व्यवस्थीत चालू आहे हे भूषणावह आहे. त्याप्रमाणे प्रतिवर्षी श्री जिव्हेश्वरांचा उत्सवही आनंदाने साजरा केला जातो. ग्रंथवाचऩ प्रातःसमयी श्रींचा जन्म उत्सव़ महाप्रसाद़ रात्रौ भोजनाचा कार्यक्रम आदी सर्व काही होत असते. यावर्षी ॲड. श्री.गजानन सदाशिव घटे डोंबिवली यांना नोटरी ऑर्डर मिळाल्याने त्यांचा मंदिरात सत्कार करण्यात आला.नवीन मंदिर उभारणी करता आपणा सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळवे.आर्थिक असो अगर वस्तूरूपात असो आपला सहकाराचा हात असावा. पढील नामसप्ताह नवीन मंदिरात व्हावा असे ठरविले आहे. सर्वांनी सहकार्य करून मंदिर उभारूया आणि फूल ना फुलाची पाकळी म्हणून देणगी अर्पुया.